राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन

महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, जिथे कुपोषणाशी लढण्याचे कार्य मोहीमेसारखे राबवण्यात येत आहे. याच उद्देशाने राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशनची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा २००५ मध्ये आणि दुसरा टप्पा नोव्हेंबर २०११ मध्ये आखण्यात आला होता. या मिशनचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे असून त्यासाठी गर्भधारणेपासून बाळाच्या पहिल्या १००० दिवस म्हणजेच वजा ९ ते २४ महिन्यांच्या कालावधीवर लक्ष केंद्रीत केले जाते

मिशनची कार्यकक्षा

बाळाचे पहिले १००० दिवस

बाळाच्या पहिल्या १००० दिवसांचे महत्व पटवून देणे

विचार गट

एक ‘विचार गट’ म्हणून कार्य करणे आणि शासनाला धोरण निश्चिती करण्याकरिता वस्तुस्थितीवर आधारीत सल्ला देणे.

आमची लढाई

कुपोषण कमी करण्याचे सामायिक उद्दिष्ट साध्य करण्याकरिता विविध विभागात एककेंद्राभिमुखता / एकवाक्यता आणणे.

आमचे नेतृत्व

श्रीमती. अ‍ॅड. यशोमती ठाकूर
मंत्री, महिला व बालविकास
श्री. बच्चू कडू
राज्यमंत्री, महिला व बाल विकास
श्रीमती. आयए कुंदन, आयएएस
प्रधान सचिव, महिला व बालविकास विभाग व महासंचालक, आरजेएमसीएन एन मिशन

आमची टीम

फेसबुक

इंस्टाग्राम

ट्विटर