नाविन्यपूर्ण उपक्रम

नाविन्यपूर्ण उपक्रम

तरंग सुपोषित महाराष्ट्राचा

एकात्मिक बाल विकास योजना आयुक्तालय, युनिसेफ आणि विभागाचे मीडिया पार्टनर यांच्या सहकार्याने मिशनने “तरंग सुपोषित महाराष्ट्राचा” हा समुपदेशन व माहिती प्रसार करण्याकरिता डिजिटल प्लटफॉर्म विकसित केला

२२ ऑक्टोबर २०२०रोजी मा. मंत्री, महिला व बाल विकास यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले, "तरंग सुपोषित महाराष्ट्राचा" हे कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पोषणविषयक आवश्यक माहिती संप्रेषित करण्यासाठी हा डिजिटल प्लटफॉर्म विकसित केले आहे. कोविड -१९ साथीने अंगणवाडी केंद्राच्या समुपदेशन आणि माहिती प्रसारण उपक्रम यासारख्या महत्त्वाच्या सेवा विस्कळीत केल्या आहेत. अश्या सेवांची तडजोड रोखण्यासाठी आणि पोषण आणि बालकांचा सर्वांगीण विकास यासबंधी समुपदेशन बळकट करण्यासाठी, दरमहा 9 लाख लाभार्थी आय. व्ही. आर. हेल्पलाईन ८०८०८०९०६३, ब्रॉडकास्ट कॉल आणि व्हाट्सअँप चॅटबॉटद्वारे - http://wa.me/918080809063?text=Hi विविध प्रकारची पोषण विषयक माहिती पोहोचविली जात आहे. या उपक्रमामध्ये “एक घास मायेचा” या पौष्टिक रेसिपीचे व्हिडिओ सिरीज द्वारे अंगणवाडी पर्यवेक्षिका बाळाचा आहार, स्वच्छताविषयक पद्धती आणि प्रतिसादात्मक आहार इत्यादी. बद्दल देखील मार्गदर्शन करून माता आणि मुलांसाठी स्थानिक पाककृती प्रदर्शित करतात.

माविम इ-बिजनेस प्लटफॉर्म 

माविमच्या सहकार्याने मिशनने “माविम इ-बिजनेस प्लटफॉर्म” विकसित केला, ज्यामुळे महिला बचत गटांच्या शेतमालाला बाजाराशी जोडण्यास मदत झाली आहे, महिला सक्षमीकरणासाठी हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

18 सप्टेंबर २०२०रोजी मा. मंत्री महोदय, महिला व बालविकास यांनी या प्लटफॉर्मचे अनावरण केले, शेती व त्यासंबंधित वस्तूंचा रिअल-टाइम डेटा घेणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच प्रणाली असेल. ही एक कमी किंमतीची प्रणाली असून शेतकरी याद्वारे पुरवठा करता येणार्‍या उत्पादनांचे प्रकार तसेच त्याचा प्रकार, प्रमाण आणि स्थान पुरवतात. प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पुरवठा केलेली माहिती एकत्रित केली जाऊ शकते. रिअल-टाइम मध्ये, अशा प्रकारे माहिती संघटित केल्याने बाजारात उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री करणे शक्य झाले आहे. ज्यामुळे महिलांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला. उदाहरणार्थ, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात कुकुटपालन करणाऱ्या महिला शेतकर्‍यांना त्यांच्या शेळ्यासाठी २०% उच्च दर मिळाला. त्याचप्रमाणे, लॉकडाऊनमुळे ठाणे येथील लहान भाजीपाला उत्पादकांना त्यांचे उत्पादन विक्रीमध्ये अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी माविमच्या अधिकाऱ्यांनी इ-बिजनेस प्लटफॉर्म वापरुन त्यांची भाजी एकत्र केली आणि ती खाजगी कंपनीला विकली.

Know Your District - आपल्या जिल्ह्याची स्थिती

आय. आय. टी. बॉम्बे या संस्थेच्या सहकार्याने मिशनने अंगणवाडी, बीट, प्रकल्प व जिल्हा पातळीवरील आयसीडीएस कॅस डेटाच्या उत्तम प्रकारे विश्लेषण करून जिल्ह्यातील सर्व स्तरावरील स्थिती कळण्यासाठी Know Your District डॅशबोर्ड विकसित केला.

संकलित केलेल्या डेटाचे अधिक चांगले व्हिज्युअलायझेशन करून विविध स्तरावरील अधिकाऱ्यांची निर्णय क्षमतांचे बळकटीकरण करून सबंधित विभागांचा समन्वय घडवून आणण्यासाठी हा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. हा डॅशबोर्ड महिला व बाल विकास सबंधित निर्देशकांचे विश्लेषण करते. सद्यस्थितीत ७ जिल्ह्यांचा डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे.

पोषण सबंधित धोरण आखणी मध्ये सहभाग

पोषण सबंधित उपक्रमांचे बळकटीकरण करण्यासाठी इतर विभागांच्या धोरणांमध्ये दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आल्या.

ICDS CAS ची प्रभावीपणे अंमलबजावणी

ICDS CAS चे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता वेळोवेळी संकलीत माहितीचे विश्लेषण करणे आणि राज्य स्तरावरून पाठपुरावा करण्यास सहकार्य करणे, तसेच भारत सरकारला क्षेत्रीय पातळीवरील समस्यांबद्दल अवगत करणे.