आम्ही काय करतो

आम्ही काय करतो

महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, जिथे कुपोषणाशी लढण्याचे कार्य मोहीमेसारखे राबवण्यात येत आहे. याच उद्देशाने राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशनची स्थापना करण्यात आली आहे. मिशनचा पहिला टप्पा २००५ मध्ये आणि दुसरा टप्पा २०११ तर तिसरा टप्पा २०१७ मध्ये आखण्यात आला होता. या मिशनचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे असून त्यासाठी गर्भधारणेपासून बाळाच्या पहिल्या १००० दिवस यावर लक्ष केंद्रीत करणे.

राजमाता जिजाऊ मिशन ही एक तांत्रिक आणि सल्लागार स्वायत्त संस्था असून संपूर्णत: युनिसेफच्या अर्थसाहाय्यावर चालते. याचा मुख्य हेतू महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि एकात्मिक बाल विकास योजना आयुक्तालय यांच्या मध्ये संवाद आणि समन्वय घडवून आणणे हा आहे.

महिला आणि बाल विकास विभाग आणि या मिशनच्या कार्यात कोणताही संभ्रम आणि पुनरावृत्ती होऊ नये याकरिता मिशनची भूमिका स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याने अगदी विचारपूर्वक निर्णय घेतला की या मिशनला शासकीय अर्थसाहाय्य देण्यात येणार नाही. यामुळे मिशनला स्वतंत्रपणे आणि स्वायत्तपणे कार्य करणे शक्य होते.

DSC02095

मिशनची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.

पहिले १००० दिवसांचे अनन्य साधारण महत्व पटवून देणे.
एक ‘विचार गट’ म्हणून कार्य करणे आणि शासनाला धोरण निश्चिती करण्याकरिता वास्तविक पुराव्यावर आधारीत सल्ला देणे.
कुपोषण कमी करण्याचे सामाइक उद्दिष्ट साध्य करण्याकरिता विविध विभांगात एकवाक्यता आणणे व समन्वय घडवून आणणे.

 

मिशनची कार्यकक्षा

कुपोषण: एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत 0-6 वर्षे वयोगटातील मध्यम व तीव्र कमी वजनाच्या बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, तसेच SAM व MAM मधील बालकांना सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्यासाठी भर देणे. ज्या ठिकाणी कमी वजनाच्या बालकांच्या जन्माचे प्रमाण जास्त आहे, अशा क्षेत्रास प्राधान्य देणे.
राज्यस्तरावरील कुपोषणाच्या आकडेवारीचे विश्लेषण करून ज्या ठिकाणी कुपोषणाच्या टक्केवारीचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी विशेष उपाययोजना करणे.
आरोग्य: गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी घेणे (कमी वजनाच्या/रक्तक्षय असलेल्या महिलांकडे विशेष लक्ष देणे), नवजात अर्भकांची काळजी आणि 0-3 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील बालकांचे आरोग्य, आहार, लसीकरणाबाबत विशेष लक्ष केंद्रीत करणे, त्याचप्रमाणे गरोदरपणात घ्यावयाच्या काळजीबाबत आरोग्य विभागाशी वेळोवेळी समन्वय करून लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होईल, यासाठी सर्व स्तरावर कार्यशाळा घेणे.
पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धोरण: अंगणवाडीत येणाऱ्या 3-6 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचे सुधारित धोरण राबविणे.
राज्यातील काही निवडक जिल्ह्यातील निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये Intensive Management of Neonatal & Childhood Illnesses आणि Home Based New-born Care प्रायोगिक तत्वावर राबवण्याकरीता सार्वजनिक आरोग्य विभागास प्रशिक्षण व प्रबलनाद्वारे सहकार्य करणे.
किशोरवयीन मुलींच्या आहार, आरोग्य व शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन बालविवाहाचे प्रमाण कमी करणे.
मिशनच्या कार्यास प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसिद्धी देणे आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लोकसहभागाद्वारे लोकचळवळ निर्माण करणे, पोषक आहार, स्तनपान, बाळाचा वरचा आहार, आणि आरोग्य विषयक जनजागृती करणे.
DSC02442
DSC01900
IMG-20190904-WA0019
Policies for promotion of nutritional outcomes_AAA Convergence2